अर्ज सुरू आहे

PM Internship Scheme : 10th, 12th पास तरुणांना Top 500 Companies मध्ये कामाची संधी आणि 5000 रुपये Stipend!

PM internship scheme apply online: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा देखील शिक्षण पूर्ण झालं असेल आणि जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर भारत सरकारने तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी दिली आहे ते म्हणजे Pm Internship Scheme 2026 च्या अपडेट नुसार भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने प्रधानमंत्री योजनेमध्ये काही महत्त्वाचे आणि मोठे बदल केले आहे. आता प्रधानमंत्री इंटरनॅशनल योजनेअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली अशा विद्यार्थ्यांना दरमहा 9000 हजार रुपये Stipend दिले जाणार आहे.

विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही दहावी, बारावी, आयटीआय किंवा डिप्लोमा किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालेला असेल आणि यामध्ये तुम्हाला चांगले टक्के मिळालेले असतील तर तुमच्यासाठी देशातील टॉप 500 कंपन्यांमध्ये काम करून अनुभव घेण्याची एक सुवर्ण संधी आहे आहे. आणि या सोबतच कंपन्यांमध्ये काम केल्यावर तुम्हाला चांगला पगार देखील दिला जातो. तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून PM Internship Scheme eligibility, योजने अंतर्गत दिले जाणारे फायदे आणि आवश्यक यासोबतच PM Internship Scheme apply online करण्याची संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या आणि आपल्या मराठी भाषेत समजून घेणार आहोत.

PM Internship Scheme 2026 नक्की काय आहे?

विद्यार्थी मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना ही भारत सरकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे आणि ही योजना बेरोजगार तरुणांसाठी सुरू करण्यात आली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती प्रधानमंत्री इंटरनशिप योजनेचा मुख्य उद्देश हा भारत देशातील 01 कोटी तरुणांना पुढील 5 वर्षांमध्ये भारतातील टॉप 500 कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये (उदाहरणार्थ: Reliance, TCS, L&T, HDFC) 12 महिन्याची Internship करण्याची संधी देणे असा आहे

यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच मिळत नाही तर कंपनीमध्ये प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव देखील मिळतो तसेच विद्यार्थ्यांना Employable बनवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे हे कोणतेही कायमस्वरूपी नोकरी नाही तर एका वर्षाचे ऑन-द-जॉब ट्रेनिंग आहे.

PM Internship Scheme Stipend & Benefits 2026

जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला तर 2026 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना खालील प्रमाणे फायदे दिले जातात

दरमहा मिळणारे 9,000 रुपये मानधन

विद्यार्थी मित्रांनो मार्च 2026 पासून लागू झालेल्या नवीन नियमानुसार इंटर्नशिप करणाऱ्या प्रत्येक तरुणाला दरमहा 9000 हजार रुपये टायपिंग दिला जाईल यापैकी 8,100 रुपये थेट उमेदवाराच्या बँक खात्यामध्ये महाडीबीटी मार्फत जमा केले जातील आणि उर्वरित 900 रुपये संबंधित कंपन्यांकडून म्हणजे ज्या कंपनीमध्ये तुम्ही इंटरनेट करत आहात त्यांच्या CSR फंडाला दिले जातील.

6,000 रुपयांचे वन-टाइम अतिरिक्त सहाय्य

तसेच दरमहा मिळणाऱ्या मानधना व्यतिरिक्त उमेदवाराला internship सुरू केल्यानंतर त्याच्या आवश्यक खर्चासाठी भारत सरकार मार्फत 6000 हजार रुपये वन टाइम ग्रँट देखील दिला जातो. आणि महत्त्वाचे म्हणजे ही रक्कम दोन टप्प्यांमध्ये मिळत असते.

जॉइनिंग झाल्यानंतर 15 दिवसाच्या आत मध्ये तुम्हाला तीन हजार रुपये दिले जातात. आणि जॉइनिंग झाल्यावर internship मध्ये 3 महिने पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा 3000 हजार रुपये दिले जातात.

PM Internship Scheme Insurance Coverage

जर उमेदवाराची योजनेअंतर्गत निवड झाली तर प्रत्येक intership करणाऱ्याला भारत सरकार द्वारे मोठ्या विमा योजनेचे संरक्षण अगदी मोफत दिले जाते. जसे, की प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना किंवा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना उमेदवारांना यामुळे इंटरशिपच्या काळात उमेदवाराला सुरक्षितता देखील मिळते.

पण महत्त्वाची माहिती म्हणजे 2026 मध्ये भारत सरकारने या योजनेमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत जेणेकरून जास्तीत जास्त तरुणांना या योजनेचा लाभ घेता येईल. आता हे महत्त्वपूर्ण बदल खाली दिलेल्या तक्त्यामध्ये व्यवस्थित रित्या आम्ही तुम्हाला समजून सांगितले आहेत.

CriteriaOld RulesNew Rules (2026)
Age Limit21 to 24 years18 to 25 years
Monthly Stipend₹5,000 per month₹9,000 per month
Family Income EligibilityLess than ₹8 lakh per yearLess than ₹12 lakh per year
Final-Year StudentsNot eligible to applyNow eligible to apply (NOC required)

PM Internship Scheme Eligibility Criteria

  • उमेदवार हा किमान दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराकडे ITI प्रमाणपत्र किंवा polytechnic चा डिप्लोमा असावा.
  • पदवीधर विद्यार्थी देखील या योजनेचा अर्ज करण्यासाठी पात्र आहेत (उदाहरणार्थ: BA. B.sc, B.com, BCA, B.Pharma)
  • Online किंवा Distance education घेणारे विद्यार्थी देखील या योजनेचा अर्ज करू शकतात.

आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वात आनंदाची बातमी म्हणजे आता जर तुम्ही पदवी किंवा पदव्युत्तर च्या फायनल इयरला असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पात्र आहात. याकरिता तुम्हाला तुमच्या कॉलेजमधून NOC – No Objection Certificate आणावे लागेल यावर मुख्याध्यापक, डीएन किंवा प्लेसमेंट ऑफिसर ची स्वाक्षरी असेल.

  • अर्जदाराचे वय अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला १८ वर्षे पूर्ण ते २५ वर्षांच्या आत असावे.
  • उमेदवाराच्या संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (मागील आर्थिक वर्षात) १२ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. (जुन्या नियमानुसार ही मर्यादा ८ लाख होती, ती आता वाढवली आहे).

या योजनेसाठी कोण अर्ज करू शकत नाही

विद्यार्थी मित्रांनो Pradhanmantri Internship योजनेचा मुख्य उद्देश हा गरजू गरीब आणि सामान्य घरातील कुटुंबातील तरुणांना पुढे आणणे असा आहे त्यामुळे खालील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र आहेत.

  • IIT, IIM, NLU, IISER, NID, IIIT आणि IISc यांसारख्या नामांकित संस्थांमधून पासआउट झालेले विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही.
  • CA, CS, CMA, MBBS, BDS, MD, MS, MBA किंवा PhD असे उच्च व्यावसायिक पातळीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी अपात्र आहेत.
  • ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती आई किंवा वडील किंवा जोडीदार कायमस्वरूपी सरकारी नोकरीवर आहे असे विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.
  • जे उमेदवार सध्या फुल टाइम नोकरी करत आहेत असे उमेदवार देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
  • आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारच्या NATS / NAPS internship योजनेचा लाभ घेतला आहे असे उमेदवार सुद्धा या योजनेसाठी अपात्र आहेत.

PM Internship Scheme Required Documents

  • आधार कार्ड (Aadhaar Card) – (मोबाईल नंबरशी लिंक असणे अनिवार्य आहे).
  • शैक्षणिक कागदपत्रे – (10 वी, 12 वी, ITI, डिप्लोमा किंवा पदवीची मार्कशीट/सर्टिफिकेट).
  • बँक पासबुक – (बँक खाते आधार कार्डशी ‘सीड’ म्हणजेच लिंक असणे अनिवार्य आहे, कारण 9,000 रुपये थेट याच खात्यात DBT द्वारे जमा होतील).
  • पासपोर्ट साईझ फोटो आणि स्वाक्षरी.
  • रहिवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate) किंवा वयाचा पुरावा.
  • कॉलेजचे NOC – (फक्त फायनल इयरला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी).

PM Internship योजना 2026 ऑनलाईन अर्ज कसा करावा?

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की PM Internship योजनेसाठी अर्ज कसा करावा याची अर्ज प्रक्रिया काय आहे तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की याची अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आणि पूर्णपणे मोफत आहे यासाठी तुम्हाला कोणालाही पैसे देण्याची गरज नाही.

अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती:

  • विद्यार्थी मित्रांनो अर्ज करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला सरकारच्या https://pminternship.mca.gov.in./login/ अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे.
  • त्यानंतर वेबसाईटचा होम पेजवर Youth Registration या पर्यायावर क्लिक करा.
  • आता तुमचा आधार कार्ड ला असलेला दहा अंकी मोबाईल नंबर येथे टाका त्यानंतर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून आधार वेरिफिकेशन पूर्ण करा. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही Digilocker वापरत असाल तर त्याद्वारे सुद्धा व्हेरिफिकेशन करू शकता.
  • आता प्रोफाइल तयार करण्यासाठी तुमची वैयक्तिक माहिती भरा, जसे की तुमचा पत्ता शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असलेल्या स्किल्स आणि तुमचा Resume अपलोड करा.
  • प्रोफाइल कंप्लिट झाल्यावरती तुमच्या शिक्षण आणि जिल्ह्यानुसार उपलब्ध असलेल्या internships तुम्हाला वेबसाईट वरती दिसतील आता तुमच्या आवडीच्या क्षेत्रात जसे की आयटी बँकिंग मॅन्युफॅक्चरिंग आणि आवडीच्या कंपनीत तुम्ही अप्लाय करू शकता.
  • विद्यार्थी मित्रांनो जर तुमची निवड झाली तर तुम्हाला पोर्टलवरूनच एक Offer letter येईल Accept करा. आणि त्यानंतर कंपनी तुम्हाला जॉइनिंग ची तारीख तसेच ठिकाण तुमच्या अधिकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे कळवेल.

Top companies and selection process

Pm internships scheme 2026 च्या नवीन अपडेट नुसार सध्या 300 हून अधिक देशातील टॉप 500 पैकी कंपन्या या सरकारच्या अधिकृत पोर्टलला जोडल्या गेल्या आहेत. 

यामध्ये प्रमुख क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान बँकींग, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल, ऊर्जा, टेलिग्राम आणि रिटेल सारख्या कंपन्या आहेत.  विद्यार्थी मित्रांनो या योजनेअंतर्गत निवड प्रक्रिया अगदी पारदर्शक पद्धतीने पार पडते पोर्टलवर एक सिस्टीम आहे जी उमेदवाराची प्रोफाइल आणि कंपनीची गरज मॅच करते आणि समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळवून देण्यासाठी पोर्टलवर विशेष काळजी घेते आणि महत्त्वाचं म्हणजे एका जागेसाठी दोन ते तीन उमेदवारांची नावे कंपनीला पाठवले जातात आणि कंपनीमधून त्या नावांची अंतिम निवड होते.

Official PMIS Portal Link

DetailsInformation
PMIS Portal Linkpminternship.mca.gov.in
National Helpline Number1800-11-6090
Contact Email[email protected]

महत्त्वाची सूचना : भारत सरकारची ही योजना पूर्णपणे मोफत आहे. कोणत्याही थर्ड-पार्टी वेबसाईटवर किंवा व्हॉट्सॲपवर आलेल्या लिंकवर जाऊन अर्ज करू नका. तसेच, कुणी नोकरी किंवा इंटर्नशिप लावून देण्यासाठी पैसे मागत असेल तर त्यांना बळी पडू नका. फक्त ‘.gov.in’ किंवा ‘.nic.in’ असलेल्या सरकारी पोर्टलवरूनच अर्ज करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

PM Internship Scheme 2026 चे नवीन Stipend किती आहे?

मार्च 2026 च्या नवीन अपडेटनुसार, आता प्रत्येक इंटर्नला दरमहा 9,000 रुपये स्टायपेंड दिले जाईल. सोबतच 6,000 रुपयांचे वन-टाइम सहाय्य देखील मिळेल.

Final Year चे विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात का?

होय! पूर्वी हा नियम नव्हता, परंतु एप्रिल २०२६ च्या नवीन आदेशानुसार पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी त्यांच्या कॉलेजमधून NOC (ना हरकत प्रमाणपत्र) आणून अर्ज करू शकतात.

ही माहिती नक्की वाचा: Documents for 10th Pass Students: 10वी नंतर प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

Swaraj
Swaraj

नमस्कार, मी स्वराज देशमुख (Founder scholarinfo.in) आणि सीनिअर कंटेंट स्ट्रॅटेजिस्ट. माझा 2019 पासूनचा Blogging आणि Graphic Designing चा प्रदीर्घ अनुभव आहे. याच अनुभवाच्या आधारावर, मी सरकारी नोकरी, करिअर संधी आणि ऑनलाईन अर्निंगच्या 'Official Data' चे विश्लेषण करून वाचकांना अचूक मार्गदर्शन देतो. युवकांना आत्मनिर्भर बनवणे हाच माझा उद्देश आहे. डेली अपडेट्ससाठी मला Instagram (@scholarinfo) वर नक्की Follow करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *