अर्ज सुरू आहे
अंतिम तारीख: 31 Oct 2026
5 दिवस बाकी

HDFC Parivartan ECSS Scholarship 2026: 10वी, ITI आणि पदवीच्या विद्यार्थ्यांना HDFC बँक देणार ₹75,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती

HDFC Parivartan ECSS Scholarship: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे, आजच्या वाढत्या महागाईमुळे आणि शिक्षणाच्या वाढत्या खर्चामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवटच सोडावे लागते. परंतु आता या आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही होतकरू आणि गरीब विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षण अर्धवट सोडावे लागणार नाही. कारण यासाठी देशातील आघाडीची बँक असलेल्या म्हणजेच HDFC बायकोने अतिशय कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. म्हणजेच HDFC बँकने आपल्या परिवर्तन या सामाजिक दायित्व उपक्रमा अंतर्गत HDFC Bank Parivartan Educational Crisis Scholarship Support 2026-27 ची मोठी घोषणा केली आहे.

आता या स्कॉलरशिप योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावी तसेच आयटीआय डिप्लोमा त्यासोबतच पदवी आणि पदवीधर याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 15 हजारापासून ते थेट 75 हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे आता जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही विद्यार्थी सध्या शिक्षण घेत असेल आणि महत्त्वाचं म्हणजे घरातील आर्थिक परिस्थिती कमजोर असेल तरीही HDFC Parivartan scholarship 2026 तुमच्यासाठी एक मोठा आधार ठरू शकते.

तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून एचडीएफसी परिवर्तन स्कॉलरशिप 2026 बाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत जसे की पात्रता फायदे आवश्यक कागदपत्रे आणि या स्कॉलरशिप साठी मोबाईल वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची ए टू झेड माहिती आज आपण पाहणार आहोत.

HDFC Bank Parivartan ECSS Scholarship 2026-27 – Key Details

Key PointsDetails
Scholarship NameHDFC Bank Parivartan ECSS Programme 2026-27
OrganizerHDFC Bank (CSR Initiative – Parivartan)
Eligible StudentsStudents from Class 1 to 12, ITI, Diploma, Undergraduate and Postgraduate courses
Scholarship Amount₹15,000 to ₹75,000 (based on the level of study)
Academic RequirementMinimum 55% marks in the previous academic year
Family Income LimitAnnual family income must be less than ₹2.5 lakh
Application ModeOnline through the Buddy4Study portal
Main ObjectiveTo support students facing financial difficulties in continuing their education

या स्कॉलरशिपसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

विद्यार्थी मित्रांनो, ही स्कॉलरशिप सर्वांसाठी खुली असली तरी विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी आणि त्यांच्या अभ्यासक्रमानुसार पात्रतेचे काही खास नियम या स्कॉलरशिपसाठी तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे एचडीएफसी परिवर्तन ECSS स्कॉलरशिप पात्रता मी तुम्हाला खालीलप्रमाणे स्टेप बाय स्टेप समजून सांगितली आहे.

1ली ते 12वी आणि ITI तसेच डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी पात्रता

  • मित्रांनो, सध्या खाजगी, सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळेत इयत्ता पहिली ते बारावीमध्ये शिकणारे विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात. म्हणजेच हे विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी पात्र आहेत.
  • यासोबतच तुम्ही दहावी किंवा बारावीनंतर मान्यता प्राप्त संस्थेमधून ITI, Polytechnic किंवा कोणत्याही फिल्डमधून Diploma Complete केला असेल, तर अशी मुलं-मुली देखील या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात.
  • फक्त विद्यार्थ्याला आपल्या मागील वर्षीच्या परीक्षेमध्ये किमान 55% गुण मिळालेले असावे. यासोबतच महत्त्वाचे म्हणजे अर्जदार विद्यार्थी हा भारतीय नागरिक असणे बंधनकारक आहे.

पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नियम

तसेच मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किंवा विद्यालयामधून पदवीचे शिक्षण घेणारे विद्यार्थी देखील यासाठी अर्ज करू शकतात. विद्यार्थ्याने खाली दिलेल्या कोर्सनुसार शिक्षण घेतलेले असावे.

  • General Courses: B.A., B.Com, B.Sc, B.C.A. इत्यादी.
  • Professional Courses: B.Tech, MBBS, LLB, B.Arch, Nursing (नर्सिंग) इत्यादी.

पदव्युत्तर (Postgraduate – PG)

  • General Courses: M.A., M.Com, M.Sc इत्यादी.
  • Professional Courses: M.Tech, MBA, MCA इत्यादी अभ्यासक्रमांचे विद्यार्थी.

गुणांची अट: पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी देखील मागील परीक्षेत किमान ५५% गुणांची अट ठेवण्यात आली आहे.

Income Limit & ECSS Condition

मित्रांनो, या स्कॉलरशिपचे पूर्ण नाव Educational Crisis Scholarship Support असे ठेवण्यात आले आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की, ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबावर एखादे आर्थिक संकट ओलांडले आहे, त्यांना प्रथम प्राधान्य देऊन या स्कॉलरशिपचा लाभ दिला जाईल.

आता आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या स्कॉलरशिपमध्ये काही इन्कम लिमिट आहे. म्हणजे अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळणारे वार्षिक उत्पन्न 2,50,000 लाखांपेक्षा जास्त नसावे. यासोबतच तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला असणे तुमच्याकडे अनिवार्य आहे.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मागील तीन वर्षांत विद्यार्थ्यांच्या कुटुंबात जर एखादी मोठी दुर्घटना झाली असेल, ज्यामुळे त्याच्या कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाले, अशा विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपमध्ये प्रथम प्राधान्य दिले जाते. तसेच अशा संकटांचा पुरावा अर्जासोबत जोडल्यास स्कॉलरशिप मिळण्याची शक्यता खूप जास्त वाढते.

Scholarship Amount Details

Education Level / Class / CourseScholarship Amount (₹)
School Education (Class 1 to 6)₹15,000 (Maximum)
School Education (Class 7 to 12)₹18,000 (Maximum)
ITI, Polytechnic & Diploma Students₹18,000 (Maximum)
General Undergraduate (UG) – BA, BCom, BSc₹30,000 (Maximum)
Professional Undergraduate (UG) – BTech, MBBS₹50,000 (Maximum)
General Postgraduate (PG) – MA, MCom₹35,000 (Maximum)
Professional Postgraduate (PG) – MBA, MTech₹75,000 (Maximum)

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे

HDFC Parivarthan ECSS Scholarship 2026 चा अर्ज करताना तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवरती अपलोड करावे लागतील. आता अर्ज भरण्यापूर्वी खाली दिलेली सर्व कागदपत्रांची फोटो स्कॅन करून पीडीएफ फॉरमॅटमध्ये तयार ठेवा. यासोबतच तुमचा आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर पण सोबत ठेवा.

  • Identity Proof: Aadhaar Card, Voter ID Card, Driving Licence
  • Previous Year Marksheet: Academic Year 2023–24 or latest marksheet, Minimum 55% marks
  • Current Year Admission Proof: Fee Receipt, College ID Card, Bonafide Certificate
  • Income Proof: Income Certificate
  • Bank Details: Student’s own Bank Passbook, Cancelled Cheque
  • Family Crisis Proof (If Applicable): Death Certificate, Medical Report, Other relevant supporting documents

HDFC Parivartan Scholarship साठी मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज कसा करावा?

बऱ्याच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की एचडीएफसी परिवर्तन स्कॉलरशिपसाठी आपण मोबाईलवरून अर्ज करू शकतो का? तर हो मित्रांनो, तुम्ही अगदी सहज पद्धतीने मोबाईलच्या माध्यमातून देखील अर्ज करू शकता. तर आता या स्कॉलरशिपचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला Buddy4Study या अधिकृत वेबसाईटवरती भेट द्यायची आहे. त्यानंतर HDFC scholarship online apply 2026 असं सर्च करा आणि हा फॉर्म भरण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स व्यवस्थित पद्धतीने फॉलो करा.

  • सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये गुगल क्रोम ओपन करून Buddy4Study च्या अधिकृत वेबसाईटला (www.buddy4study.com) भेट द्या.
  • वेबसाईटच्या होमपेजवर वरच्या बाजूला असलेल्या सर्च बारमध्ये “HDFC Bank Parivartan’s ECSS Programme 2026-27” असे सर्च करा.
  • तुमच्यासमोर HDFC स्कॉलरशिपची सविस्तर माहिती असलेले पेज ओपन होईल. तेथे सर्व माहिती वाचून खाली दिलेल्या ‘Apply Now’ (आता अर्ज करा) या हिरव्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला पोर्टलवर Login/Register करावे लागेल. जर तुमचे आधीच खाते असेल तर Email किंवा मोबाईल नंबर टाकून लॉगीन करा. नवीन विद्यार्थी असाल तर ‘Register’ वर क्लिक करून मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि स्वतःचा पासवर्ड तयार करून रजिस्ट्रेशन पूर्ण करा.
  • लॉगीन पूर्ण झाल्यानंतर, ‘Start Application’ (अर्ज सुरू करा) या बटणावर क्लिक करा.
  • आता तुमच्यासमोर HDFC Parivartan ECSS Scholarship चा मुख्य ऑनलाईन फॉर्म ओपन होईल. यामध्ये विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती, पत्ता, शैक्षणिक माहिती (शाळा/कॉलेजचे नाव, टक्केवारी) आणि बँक खात्याचा तपशील अचूक भरा.
  • कुटुंबाच्या आर्थिक संकटाविषयी विचारले असल्यास, त्याची योग्य ती माहिती तिथे द्या.
  • यानंतर ‘Upload Documents’ सेक्शनमध्ये जाऊन वर सांगितलेली सर्व कागदपत्रे (उदा. आधार कार्ड, मार्कशीट, उत्पन्नाचा दाखला) अपलोड करा.
  • शेवटी सर्व अटी व शर्ती (Terms & Conditions) मान्य करून ‘Preview’ बटणावर क्लिक करा. तुम्ही भरलेली सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा.
  • माहिती अचूक असल्यास ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज यशस्वीरीत्या सबमिट होईल. अर्जाची प्रिंट काढून किंवा PDF सेव्ह करून मोबाईलमध्ये सुरक्षित ठेवा.

अर्जाची निवड प्रक्रिया आणि मुलाखत

अनेक विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की आपण अर्ज केल्यानंतर स्कॉलरशिप नक्की कशी मिळते, तर बघा, एचडीएफसी बँकेने यासाठी पारदर्शक निवड प्रक्रिया ठरवली आहे.

  • सर्वप्रथम अर्जाची छाननी केली जाते. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे मार्क, त्याच्या कुटुंबाचे उत्पन्न आणि कुटुंबावरील आर्थिक संकट या तीन मुख्य गोष्टींच्या आधारावर पहिली यादी तयार होते.
  • त्यानंतर यादी शॉर्टलिस्ट झाल्यावर विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन कागदपत्रांची सखोल तपासणी केली जाते.
  • आणि अनेकदा Buddy4Study यांच्या टीमकडून किंवा एचडीएफसीच्या प्रतिनिधीकडून विद्यार्थ्यांची किंवा पालकांची मोबाईल नंबरवरती संपर्क देखील साधला जातो. यावेळी तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल किंवा शिक्षणाबद्दलचे प्रश्न विचारू शकतात.
  • आता मुलाखतीनंतर अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार केली जाते आणि शिष्यवृत्तीचे पैसे टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात.

अधिकृत वेबसाईट, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि डायरेक्ट लिंक

DetailWebsite
Official Application Portal (Apply Online Link)Buddy4Study Official Portal
HDFC Parivartan Official Websitewww.parivartanecss.com

Last Date of 2026: ही स्कॉलरशिप साधारणतः वर्षातून 3 वेगवेगळ्या Rounds मध्ये चालते (उदा. सप्टेंबर, ऑक्टोबर, डिसेंबर). 2026 च्या अधिकृत तारखांसाठी कृपया पोर्टल चेक करा, लवकरात लवकर अर्ज करणे फायद्याचे ठरेल.

Conclusion

मित्रांनो, या स्कॉलरशिप अंतर्गत आर्थिक परिस्थितीमुळे मागे पडणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे. HDFC Parivarthan ECSS Scholarship 2026 हे विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने एक जीवनदायी ठरली आहे. जर आता तुम्ही देखील या योजनेच्या अटीमध्ये बसत असाल, तर आजच तुमचे उत्पन्नाचे दाखले आणि मार्कशीट गोळा करा आणि मोबाईलच्या माध्यमातून किंवा कम्प्युटरच्या माध्यमातून तुमचा अर्ज भरा. तसेच, ही उपयुक्त माहिती तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. ही माहिती तुम्ही WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून गरजू गरीब विद्यार्थ्यांसोबत शेअर करू शकता, जेणेकरून कोणाचे तरी शैक्षणिक भविष्य उज्वल होण्यास मदत होईल.

Swaraj
Swaraj

नमस्कार, मी स्वराज देशमुख (Founder scholarinfo.in) आणि सीनिअर कंटेंट स्ट्रॅटेजिस्ट. माझा 2019 पासूनचा Blogging आणि Graphic Designing चा प्रदीर्घ अनुभव आहे. याच अनुभवाच्या आधारावर, मी सरकारी नोकरी, करिअर संधी आणि ऑनलाईन अर्निंगच्या 'Official Data' चे विश्लेषण करून वाचकांना अचूक मार्गदर्शन देतो. युवकांना आत्मनिर्भर बनवणे हाच माझा उद्देश आहे. डेली अपडेट्ससाठी मला Instagram (@scholarinfo) वर नक्की Follow करा.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *