अंतिम तारीख संपली

Bharti Airtel Scholarship 2026-27: कॉलेजची पूर्ण फी कंपनी भरणार, असा करा ऑनलाईन अर्ज!

विद्यार्थी मित्रांनो, आजच्या काळामध्ये इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी क्षेत्रात शिक्षण घेणे म्हणजे खूपच खर्चिक झाले आहे. आता लाखो रुपयांची कॉलेज फी, तसेच होस्टेलचा खर्च आणि अभ्यासक्रमासाठी लागणारा महागडा लॅपटॉप, या सर्व गोष्टींमुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न अपूर्णच राहते. आता याच समस्येवर मात करण्याकरिता Bharti Airtel Foundation मार्फत एक नवीन महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे. तिचे नाव Bharti Airtel Scholarship 2026-27 असे आहे.

विद्यार्थी मित्रांनो, आता या स्कॉलरशिप अंतर्गत देशातील होतकरू आणि हुशार विद्यार्थ्यांची 100% Tuition Fee ही एअरटेल कंपनीमार्फत भरण्यात येणार आहे. आणि एवढेच नाही, तर विद्यार्थ्यांचा होस्टेलला राहण्याचा खर्च, तसेच त्यांच्या मेसचा खर्च आणि पहिल्या वर्षी एका उत्तम दर्जाचा लॅपटॉपदेखील विद्यार्थ्यांना अगदी फ्री मध्ये देण्यात येणार आहे.

आता जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी विद्यार्थी 2026-27 च्या शैक्षणिक वर्षात इंजिनीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेत असेल, तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण या लेखामध्ये आज आपण Bharti Airtel Scholarship Eligibility, Benefits आणि Online Apply कसं करायचं, याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Bharti Airtel Scholarship Program 2026-27 (Overview Table)

DetailsInformation
Scholarship NameBharti Airtel Scholarship Program 2026–27
Launched ByBharti Airtel Foundation
Eligible StudentsFirst-Year Engineering and Technology Students
College RequirementAdmission to one of India’s Top 50 NIRF-Ranked Engineering Institutes
Main Benefits100% Tuition Fee Coverage, Hostel & Mess Fee Support, and a Free Laptop
Family Income LimitAnnual Family Income should be less than ₹8.5 Lakh
Application ModeOnline Application
BeneficiariesEligible Students Across India
Official Websitebhartiairtelfoundation.org

एअरटेल स्कॉलरशिपसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

मित्रांनो, या स्कॉलरशिपचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या अटी आणि नियम पूर्ण करावे लागतील. जर तुम्ही Bharti Airtel Scholarship Eligibility पूर्ण करत असाल, तरच तुमचा अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.

इंजिनिअरिंग, आयटी (IT) आणि पदवीच्या (UG) विद्यार्थ्यांसाठी पात्रता नियम

  • पहिल्या वर्षामध्ये प्रवेश: विद्यार्थी हा 2026-27 च्या या शैक्षणिक वर्षामध्ये Undergraduate Engineering किंवा पाच वर्षांच्या Integrated Technology Courses च्या 1st Year मध्ये शिकत असावा.
  • दुसरी आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे विद्यार्थ्याने भारतातील Top 50 NIRF Ranked Engineering Colleges पैकी एका कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला असावा.

विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंगच्या सर्वच ब्रांचेस या स्कॉलरशिपसाठी पात्र नाहीत. आता खालीलप्रमाणे जर तुम्ही या ब्रांचेसमध्ये शिक्षण घेत असाल, तरच तुम्ही या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकता.

  • Eligible Engineering Branches Details
  • Computer Science Computer Science Engineering (CSE)
  • Information Technology Information Technology (IT)
  • Electronics & Communication Electronics & Communication Engineering (ECE)
  • Telecom Telecommunication Engineering
  • Data Science Data Science Engineering
  • Aerospace Aerospace Engineering
  • Emerging Technologies Artificial Intelligence (AI), Machine Learning (ML), Internet of Things (IoT), Augmented Reality (AR), Virtual Reality (VR), and Robotics
  • तसेच, यामधील सर्वात महत्त्वाची आठवण म्हणजे विद्यार्थ्यांनी कोणत्याही इतर सरकारी किंवा खाजगी शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा किंवा तो घेत नसावा.
  • तसेच, अर्ज करणारा विद्यार्थी हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. यासोबतच, तो भारतातील रहिवासी असावा.

कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची अट

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे गरजू, गरीब आणि मध्यमवर्गीय हुशार विद्यार्थ्यांना मदत करणे असा आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न किती असावे, याची अट खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.

  • विद्यार्थ्यांचे कुटुंबाचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापासून ते 8.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • ज्या विद्यार्थ्यांचे पालक नोकरी करतात, त्यांच्यासाठी मागील वर्षाचा Income Tax Return आणि Bank Statement सादर करणे आवश्यक आहे.
  • तसेच, ज्या विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी किंवा असंघटित कामगार आहेत, त्यांच्याकडे तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्याने दिलेला अधिकृत उत्पन्नाचा दाखला असणे अनिवार्य आहे.

शिष्यवृत्तीची रक्कम आणि मिळणारे फायदे

विद्यार्थी मित्रांनो, ही स्कॉलरशिप देशातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित स्कॉलरशिपपैकी एक मानली जाते, कारण यामध्ये Bharti Airtel Scholarship Benefit खूप जास्त प्रमाणात आहेत.

  • विद्यार्थ्यांच्या इंजिनिअरिंगच्या पूर्ण चार किंवा पाच वर्षांच्या कोर्सेसची 100% वार्षिक फी कंपनीमार्फत भरण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांवर फी भरण्याचा कोणताही अतिरिक्त ताण येणार नाही.
  • जर विद्यार्थी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत असेल, तर त्याचा शंभर टक्के होस्टेल आणि मेसचा खर्च कंपनीमार्फत उचलण्यात येणार आहे.
  • आणि महत्त्वाचं म्हणजे, जर कॉलेज होस्टेलमध्ये जागा नसेल आणि विद्यार्थ्याला खाजगी पीजी किंवा रूम भाडे करून राहावे लागत असेल, तरीही त्याला कॉलेजच्या हॉस्टेलच्या फीची रक्कम राहण्याकरिता तसेच जेवणासाठी दिली जाणार आहे.
  • आणि यात स्कॉलरशिपमार्फत देण्यात येणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॅपटॉप. टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना कोडींग आणि प्रोजेक्ट करण्यासाठी चांगल्या लॅपटॉपची खूप गरज असते. म्हणून पहिल्या वर्षात निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला कंपनीमार्फत एक दर्जेदार आणि ब्रँडेड लॅपटॉप मोफत दिला जाणार आहे.
  • विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या स्कॉलरशिपमार्फत केवळ आर्थिक मदतच मिळणार नाही, तर भविष्यामध्ये नोकरी मिळवण्यासाठी देशातील दिग्गज आयटी कंपन्यांकडून मार्गदर्शनसुद्धा दिले जाणार आहे.

स्कॉलरशिपचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र)
  • इयत्ता 10 वी व 12 वी चे मार्कशीट
  • प्रवेशपत्र (Admission Letter) व फी स्ट्रक्चर
  • JEE Main किंवा इतर प्रवेश परीक्षेचे स्कोअरकार्ड
  • उत्पन्नाचा पुरावा (ITR/उत्पन्नाचा दाखला) व 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • विद्यार्थी व पालकांचे बँक पासबुक
  • कॉलेजचे बँक खात्याचे तपशील
  • विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईझ फोटो
  • SOP (Statement of Purpose)
  • भाडे करार किंवा भाडे पावती (लागू असल्यास)

Bharti Airtel Scholarship साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

विद्यार्थी मित्रांनो, भारती एअरटेल स्कॉलरशिपची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि ही डिजिटल करण्यात आली आहे. आता विद्यार्थी घरबसल्या त्यांच्या मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारे खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

  • सर्वात आधी तुम्हाला भारती एअरटेल फाउंडेशनच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे किंवा Study Buddy पोर्टलवर Bharti Airtel Scholarship हे पेज ओपन करा.
  • आता जर तुम्ही नवीन यूजर असाल, तर सर्वप्रथम तुमचा स्वतःचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून स्वतःचे नवीन अकाउंट तयार करून घ्या.
  • त्यानंतर डॅशबोर्डवरती लॉगिन करा. आता तुमच्यासमोर Apply Now किंवा Start Application हे पर्याय दिसतील. तर या बटनावरती क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचे नाव, पत्ता, कॉलेजचे नाव, कोर्सेसचे नाव, तसेच JEE Score आणि तुमच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची माहिती अचूक पद्धतीने भरा.
  • आता वेबसाईटवर सांगितल्याप्रमाणे, नियमानुसार तसेच यादीनुसार सर्व आवश्यक ती कागदपत्रे PDF किंवा JPEG फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  • विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिपमार्फत मिळण्यात येणारी कॉलेजची फी थेट कॉलेजच्या किंवा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. म्हणून कॉलेजचे आणि तुमचे बँक डिटेल्स अगदी अचूक पद्धतीने भरा.
  • आता शेवटी तुम्हाला Preview या बटनवरती क्लिक करायचे आहे आणि तुम्ही भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून घ्यायची आहे. त्यानंतर सर्व योग्य असल्यास नियम आणि अटी मान्य करून Submit या बटनवर क्लिक करा.
  • अर्ज सबमिट झाल्यानंतर त्याची एक प्रिंटआउट किंवा PDF फाईल तुमच्याकडे सुरक्षित ठेवा.

विद्यार्थ्यांची निवड कशी केली जाणार?

अनेक विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे. तर बघा, या स्कॉलरशिपसाठी देशामधून हजारो विद्यार्थी अर्ज करत असतात. त्यामुळे निवड प्रक्रिया अगदी पारदर्शक आणि Merit-cum-Means या तत्त्वांवर आधारित असते.

  • म्हणून विद्यार्थ्यांचे बारावीचे आणि JEE चे मार्क, तसेच त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न या आधारावर पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांची एक शॉर्टलिस्ट तयार केली जाते.
  • नंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या सर्व कागदपत्रांचे वेरिफिकेशन केले जाते.
  • आणि विशेष म्हणजे, मुलींना प्रथम प्राधान्य देण्यात येते. याशिवाय दिव्यांग विद्यार्थी, तसेच अनाथ विद्यार्थी आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना देखील प्राधान्य मिळते.
  • त्यानंतर अंतिम निवडीपूर्वी विद्यार्थ्यांची एक छोटीशी टेलिफोनिक आणि ऑनलाईन मुलाखत देखील घेतली जाऊ शकते, ज्यामध्ये त्यांची आर्थिक स्थिती आणि करिअरविषयीचे ध्येय जाणून घेतले जात असते.

Important Links

WebsiteLink
Official WebsiteBharti Airtel Foundation
Application Portal (Buddy4Study)Buddy4Study – Bharti Airtel Scholarship 2026–27

विद्यार्थी मित्रांनो, या स्कॉलरशिपअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 Oct 2026 अशी आहे. म्हणून त्यापूर्वी या स्कॉलरशिपसाठी अर्ज नक्की करा. महत्त्वाचं म्हणजे, या अधिकृत तारखांमध्ये बदल देखील होऊ शकतात. म्हणून वेळोवेळी अधिकृत वेबसाईट नक्की तपासा. आणि जर तारखेमध्ये काही बदल झालाच, तर scholarinfo.in वेबसाईटवरती तुम्हाला सर्वात आधी अपडेट मिळेल.

भारती एअरटेल स्कॉलरशिप 2026-27 साठी कोण अर्ज करू शकते?

भारतातील टॉप 50 NIRF रँकिंग असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये (उदा. IITs, NITs) कॉम्प्युटर सायन्स, IT किंवा इतर इमर्जिंग टेक्नॉलॉजीच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात.

या स्कॉलरशिपसाठी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा किती आहे?

अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न ₹8.5 लाखांपेक्षा जास्त नसावे.

एअरटेल स्कॉलरशिपअंतर्गत विद्यार्थ्यांना कोणते मुख्य फायदे मिळतात?

या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची 100% Tuition Fee, हॉस्टेल आणि मेसचा पूर्ण खर्च एअरटेल कंपनी भरते. यासोबतच विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षी अभ्यासासाठी एक Free Laptop देखील दिला जातो.

Swaraj
Swaraj

नमस्कार, मी स्वराज देशमुख (Founder scholarinfo.in) आणि सीनिअर कंटेंट स्ट्रॅटेजिस्ट. माझा 2019 पासूनचा Blogging आणि Graphic Designing चा प्रदीर्घ अनुभव आहे. याच अनुभवाच्या आधारावर, मी सरकारी नोकरी, करिअर संधी आणि ऑनलाईन अर्निंगच्या 'Official Data' चे विश्लेषण करून वाचकांना अचूक मार्गदर्शन देतो. युवकांना आत्मनिर्भर बनवणे हाच माझा उद्देश आहे. डेली अपडेट्ससाठी मला Instagram (@scholarinfo) वर नक्की Follow करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *