Documents for 10th Pass Students” विद्यार्थी मित्रांनो तुम्ही देखील यावर्षी दहावी बोर्डाची परीक्षा पास झाला असा तर हा लेख तुमच्यासाठीच आहे कारण निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची आणि पालकांची खरी ओढाताण सुरू होते ती म्हणजे 11th मध्ये Admission किंवा Polytechnic मध्ये Admission घेण्यासाठी पण अनेक वेळा सर्व कागदपत्रे असून देखील एक Document नसल्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात येतो.
तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी 2026 मध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असल्याने तुम्हाला कागदपत्रे वेळेवर अपलोड करणे आणि ते व्हेरिफाय करणे अत्यंत गरजेचे आहे. तर 2026 च्या नवीन शैक्षणिक धोरणांनुसार आणि प्रवेश प्रक्रियेच्या नियमानुसार तुम्हाला कोणती कागदपत्रे हे ऍडमिशन करण्यासाठी गरजेची आहे याची संपूर्ण माहिती मी आजच्या लेखांमध्ये तुम्हाला समजून सांगितली आहे.
Common documents for all
विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आर्ट्स कॉमर्स किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग यापैकी कोणत्याही शाखेमध्ये ऍडमिशन घेत असाल तर खाली दिलेली सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
- 10th Original Marksheet: विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट जाहीर झाल्यानंतर लगेचच आपल्याला शाळेमधून ओरिजनल मार्कशीट दिली जाते म्हणूनच प्रवेश प्रक्रियेच्या वेळी ओरिजनल मार्कशीट आणि किमान 05 ते 10 Attested झेरॉक्स प्रत सोबत नक्की ठेवा.
- Leaving Certificate – LC: विद्यार्थी मित्रांनो हा सर्वात महत्त्वाचा पुरावा आहे जर तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातील कॉलेजमध्ये प्रवेश घेत असाल तर काही ठिकाणी यावर शिक्षण अधिकाऱ्याची Counter Signature देखील लागते म्हणून याची खात्री नक्की करून घ्या (डिप्लोमा मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Leaving Certificate – LC अनिवार्य असते)
- Aadhar Card: या कागदपत्रांपैकी सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट म्हणजे आपले आदर कार्ड आणि हे आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे विशेषता आदर वरील नाव आणि दहावीच्या मार्कशीट वरील नाव तसेच जन्मतारीख यामध्ये कोणतेही मिस्टेक नसावी जर या नावामध्ये बदल असेल तर आजच तुमच्या गावातील जवळील आधार सेंटर वरती जाऊन सर्व माहिती दुरुस्त करून घ्या.
- पासपोर्ट साईज फोटो: मित्रांनो आपली ओळख पटवण्यासाठी आणि स्कॅनिंग साठी पासपोर्ट साईज फोटो अनिवार्य असतो तर याच्या किमान दहा ते पंधरा लेटेस्ट रंगीत ऑफिस तुमच्या जवळ ठेवा आणि शक्य असल्यास फोटोचे बॅकग्राऊंड ग्रे कलर चे किंवा पांढऱ्या कलरचे असू द्या.
Documents required to avail reservation
विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही Reserved Category म्हणून अर्ज करणार असाल तर तुम्हाला खाली दिलेल्या कागदपत्रांशिवाय आरक्षणाचा किंवा फी मध्ये मिळणाऱ्या सवलतीचा फायदा मिळणार नाही म्हणूनच ऍडमिशन करताना तुम्ही ज्या कॅटेगिरीचे असाल त्या कॅटेगिरी साठी लागणारी कागदपत्रे सोबत नक्की ठेवा.
| कागदपत्र | कोणत्या प्रवर्गासाठी? | महत्त्वाची टीप |
| Caste Certificate | SC, ST, VJ/NT, OBC, SBC | सक्षम प्राधिकाऱ्याने (SDO/Tehsildar) दिलेला असावा. |
| नॉन-क्रिमिलेयर (NCL) | VJ/NT, OBC, SBC | याची वैधता 31 मार्च 2027 पर्यंत असणे आवश्यक आहे. (SC/ST साठी गरज नाही). |
| Validity | सर्व आरक्षित प्रवर्ग | इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी हे अनिवार्य आहे. ११ वी साठी अर्जाची पावती चालते. |
Documents required for financial relief (For Scholarship/EWS)
प्रत्येक विद्यार्थ्याच्या कॅटेगिरी नुसार सरकारने आरक्षणाची कागदपत्रे वेगवेगळी ठेवली आहे विद्यार्थी मित्रांनो महाविद्यालयाचे FEES कमी व्हावी आणि तुम्हाला स्कॉलरशिप मिळावे यासाठी तुमच्याकडे खाली दिलेली कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
- Income Certificate: विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप चा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे आता तुमच्या वडिलांच्या नावाचा एक एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या आर्थिक वर्षाचा तहसीलदाराचा स्वाक्षरीचा दाखला असणे आवश्यक आहे हा दाखला स्कॉलरशिप साठी EBC/Hostel Allownce यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो.
- Economically Weaker Section: विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही ओपन कॅटेगिरी मध्ये येत असाल आणि तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला दहा टक्के आरक्षणासाठी प्रमाणपत्र काढावे लागते आणि महत्त्वाचे म्हणजे EWS 2026 त्या नवीन अपडेट नुसार हे प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षाचे असणे आवश्यक आहे.
Domicile and other certificates
- Maharashtra Domicile: विद्यार्थी मित्रांनो डोमिसाईल सर्टिफिकेट हे पण खूप महत्त्वाचे असते तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी हे प्रमाणपत्र काढावे लागते आता ज्यांच्याकडे जन्माचा दाखला हा महाराष्ट्रातील आहे त्यांना या ठिकाणी सर्टिफिकेट मिळते पण डोमेसाईल सर्टिफिकेट असणे सुरक्षितच राहते म्हणून हे नक्की काढून घ्या.
- Nationality : राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र पण मित्रांनो साधारणपणे डोमेसाईल सर्टिफिकेट वरतीच इंडियन असा उल्लेख असतो त्यामुळे तुम्हाला वेगळ्या सर्टिफिकेट करण्याची गरज नसते पण इंडियन हा उल्लेख नसल्यास तुम्हाला हे स्वतंत्र सर्टिफिकेट काढावे लागेल
- बँक पासबुक झेरॉक्स: विद्यार्थी मित्रांनो बँक पासबुकची झेरॉक्स हे स्कॉलरशिप साठी लागणारे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत शासनाच्या DBT पोर्टलवरून स्कॉलरशिप चे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे स्वतःचे बँक खाते असणे गरजेचे आहे आणि महत्त्वाचे म्हणजे हे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे बंधनकारक आहे.
हा लेख सुद्धा नक्की वाचा: SSC Rechecking 2026: 10 वी रिचेकिंगसाठी ऑनलाईन अर्ज सुरू; स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस आणि महत्त्वाच्या तारखा येथे पहा!
Documents for special reservations
विद्यार्थी मित्रांनो जर तुमची विशेष कोट्यामधून प्रवेश घ्यायची इच्छा असेल तर खाली दिलेली कागदपत्रे तुमच्या महत्त्वाच्या सर्व कागदपत्रांसोबत नक्की जोडा जेणेकरून तुम्हाला या कागदपत्रांच्या माध्यमातून विशेष आरक्षण मिळेल आणि यामुळे तुमची कॉलेजची फी देखील कमी होऊ शकते.
- Divyang Certificate: सरकारी रुग्णालयातील (Civil Surgeon) स्वाक्षरीचे ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असलेले प्रमाणपत्र.
- Sports Certificate: विभागीय किंवा राज्य स्तरावरील खेळाडू असल्यास जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून पडताळणी केलेले प्रमाणपत्र.
- Defense Quota: माजी सैनिक किंवा कार्यरत सैनिकांच्या पाल्यांसाठी आवश्यक.
- प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त प्रमाणपत्र: जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र.
- Orphan Certificate: अनाथ मुलांसाठी राखीव कोट्याचा लाभ घेण्यासाठी.
Checklist to be done before admission
- विद्यार्थी मित्रांनो आपली सर्व कागदपत्रे सरकारच्या Digilocker Application मध्ये SAVE करून ठेवा कारण आजकाल ऑनलाईन परताळणीसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
- तुमच्या मार्कशीट मध्ये किंवा आधार कार्ड मध्ये आणि जातीच्या दाखल्या वरती तुमचे नाव एकसारखे आहे का हे नक्की तपासा आणि काही स्पेलिंग मिस्टेक असल्यास ते दुरुस्त नक्की करा.
- सर्व ओरिजनल कागदपत्रे म्हणजेच PDF/JPEG फॉर्मेट मध्ये तुमच्या पेन ड्राईव्ह किंवा ई-मेल मध्ये सेव नक्की करून ठेवा.
- आणि विशेष म्हणजे तुमच्याकडे असलेला नॉन-क्रिमिलेयर आणि उत्पन्नाचा दाखला मुदत संपली आहे की नाही हे नक्की तपासा कारण हे दोन कागदपत्रे आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
माझ्याकडे जर जातीचा दाखला असेल पण व्हॅलिडीटी नाही तर मला प्रवेश मिळेल का?
हो विद्यार्थी मित्रांनो नक्कीच अकरावी मध्ये प्रवेशासाठी अर्ज केल्याची पावती दाखवून तुम्ही तात्पुरता प्रवेश घेऊ शकता मात्र व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी उदाहरणार्थ जर तुम्हाला डिप्लोमा मध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर त्यासाठी जातीचा दाखला महत्त्वाचा असतो.
उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावाचा असावा?
तुझ्याकडे असलेला उत्पन्नाचा दाखला हा तुमच्या कुटुंबातील नेहमी प्रमुख व्यक्तीच्या नावावर असावा जसे की तुमचे आई-वडील किंवा पालक यांच्या नावावर जर हा दाखला असेल तर तुम्हाला आरक्षणाचा लाभ नक्की मिळू शकतो.
आधार कार्डवर जुना फोटो आहे, चालतो का?
हो नक्कीच जुना फोटो असलेला चालतो पण तुमचे नाव आणि जन्मतारीख अचूक असणे गरजेचे आहे.
ईडब्ल्यूएस (EWS) सवलत कोणाला मिळते?
जे विद्यार्थी कोणत्याही आरक्षणात (OBC/SC/ST) येत नाहीत आणि ज्यांचे उत्पन्न ८ लाखांच्या आत आहे, त्यांना १०% आरक्षण मिळते.
