अर्ज सुरू आहे
अंतिम तारीख: 15 Nov 2026

Kotak Kanya Scholarship 2026-27: 12 वी पास मुलींसाठी कोटक बँकेची सर्वात मोठी स्कॉलरशिप

मित्रांनो, भारतामधील अनेक हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची खूप इच्छा असते. परंतु, अनेक विद्यार्थ्यांना आपले इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा इतर व्यवसायिक शिक्षण घेण्याचे स्वप्न फक्त पैशांच्या अभावी सोडून द्यावे लागते. आता याच समस्येवर मात करण्याकरिता आणि मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याकरिता Kotak Mahindra Group आणि Kotak Education Foundation तर्फे Kotak Kanya Scholarship 2026-27 ची घोषणा करण्यात आली आहे.

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही भारतामधील सर्वात प्रतिष्ठित आणि आर्थिक दृष्ट्या मोठी स्कॉलरशिप मानली जात असते. आता या योजनेअंतर्गत निवड झालेल्या मुलींना त्यांच्या पदवीचे शिक्षण पूर्ण करण्याकरिता तब्बल 1.5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. म्हणूनच, जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणीही विद्यार्थिनी नुकतीच बारावी उत्तीर्ण झाली असेल आणि पुढील व्यवसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेत असेल, तर हा लेख काळजीपूर्वक वाचा.

या आर्टिकलच्या माध्यमातून आपण Kotak Kanya Scholarship 2026 ची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तसेच, यासाठी कोणती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत, याचे फायदे काय असतील आणि Kotak Kanya Scholarship साठी अर्ज प्रक्रिया कशी पूर्ण करायची, याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण समजून घेणार आहोत.

Kotak Kanya Scholarship 2026-27 – Overview Table

ParametersDetails
Scholarship NameKotak Kanya Scholarship 2026–27
Offered ByKotak Mahindra Group and Kotak Education Foundation
BeneficiariesMeritorious Class 12 (Higher Secondary) passed girl students from across India
Scholarship AmountUp to ₹1,50,000 per year
Applicable CoursesProfessional Undergraduate Degree Courses
Application ModeOnline Application
Official PortalBuddy4Study Portal
Last Date to Apply15-Nov-2026

या स्कॉलरशिपसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अटी

मित्रांनो, कोटक स्कॉलरशिपसाठी पात्रता आणि निकष अतिशय स्पष्ट आहेत. महत्त्वाचं म्हणजे, खऱ्या आणि गरजू तसेच हुशार विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. आता तुम्ही खालील अटी पूर्ण करत असल्यास, तुम्ही या स्कॉलरशिपसाठी पात्र ठरू शकता.

12वी मधील गुणांची अट – किमान 75% किंवा त्याहून अधिक

या स्कॉलरशिपचा अर्ज करण्यासाठी विद्यार्थिनीने इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेत किमान 75% किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेले असावेत. या अटीमुळे खऱ्या आणि हुशार विद्यार्थिनींनाच उच्च शिक्षण घेण्याचे प्रोत्साहन मिळते.

व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश

सदर विद्यार्थिनीने 2026-27 या शैक्षणिक वर्षात First Year व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा. यामध्ये खालील अभ्यासक्रमांचा समावेश होतो:

  • Engineering (B.E. / B.Tech)
  • Medicine (MBBS)
  • Integrated LLB
  • Integrated BS-MS / BS-Research
  • Design
  • Architecture

NOTE : सदर प्रवेश हा NIRF किंवा NAAC मानांकन (Accreditation) प्राप्त असलेल्या प्रतिष्ठित महाविद्यालयात झालेला असावा.

Maximum annual family income limit

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ही योजना प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थिनींसाठी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनीच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न हे सहा लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. महत्त्वाचं म्हणजे, शेतकरी, कामगार आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी ही उत्पन्नाची अट अत्यंत दिलासादायक मानली जाते.

तसेच, सर्वात महत्त्वाचं म्हणजे, Kotak Mahindra Group किंवा Buddy4Study च्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.

Scholarship Amount & Benefits

मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे Kotak Kanya Scholarship Benefits हे केवळ ट्युशन फीपुरतेच मर्यादित नाहीत, तर विद्यार्थिनीला तिचा अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत दरवर्षी दीड लाख रुपयेपर्यंतची मदत यामार्फत दिली जात असते.

आता या रकमेचा वापर विद्यार्थिनी खालील शिक्षणाचा खर्च पूर्ण करण्यासाठी करू शकतात.

  • त्यांच्या महाविद्यालयाची महागडी फी भरण्याकरिता.
  • वस्तीगृह आणि जेवणाचा खर्च भागवण्याकरिता.
  • आजच्या डिजिटल युगामध्ये अभ्यासक्रमासाठी लागणारे लॅपटॉप आणि इंटरनेटच्या खर्चाकरिता.
  • मुलींना लागणाऱ्या मेडिकल तसेच इंजिनिअरिंगच्या महागड्या पुस्तकांसाठी देखील याचा विद्यार्थिनी वापर करू शकतात.
  • महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी लागणारा खर्च यामधून विद्यार्थिनी भागवू शकतात.

म्हणजेच, थोडक्यात सांगायचे झाले तर विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा संपूर्ण आर्थिक भार कोटक कन्या स्कॉलरशिपतर्फे उचलला जातो, ज्यामुळे मुलींना केवळ त्यांच्या अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रित करता येते.

Required Documents Checklist

मित्रांनो, अर्ज भरताना तुमच्याकडे सर्व कागदपत्रे तयार असणे आवश्यक आहे. अपूर्ण कागदपत्रांमुळे तुमचा अर्ज रिजेक्ट देखील होऊ शकतो. जर तुम्हाला कोटक कन्या स्कॉलरशिप 2026 साठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची असेल, तर खाली दिलेल्या कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी सोबत ठेवा.

  • Class 12 Mark Sheet
  • Income Certificate
  • Income Tax Return (ITR) for FY 2025–26 (if applicable)
  • College Admission Letter
  • Seat Allocation Letter / Allotment Slip
  • Bonafide Certificate
  • College Fee Structure for Academic Year 2026–27
  • Entrance Examination Scorecard (NEET / JEE / MHT-CET / Other Applicable Exam)
  • Masked Aadhaar Card
  • Bank Passbook (First Page Copy)
  • Recent Passport-size Photograph
  • Disability Certificate (If Applicable)
  • Parent(s) Death Certificate (If Applicable)
  • Photographs of the House Showing Financial Condition

Kotak Kanya Scholarship साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, कोटक कन्या स्कॉलरशिप करिता अर्ज प्रक्रिया पूर्ण कशी करावी? तर बघा, ही अर्ज प्रक्रिया तुम्ही अगदी ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करू शकता आणि ही अगदी सोपी आहे. खाली दिलेल्या स्टेप्स व्यवस्थित फॉलो करून तुम्ही या स्कॉलरशिपचा अर्ज करू शकता.

  • सर्वप्रथम Buddy4Study च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि तेथे कोटक कन्या स्कॉलरशिप 2026-27 या पेजवर क्लिक करा.
  • त्यानंतर तेथे Apply Now बटणावर क्लिक करा.
  • आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमचे जर Buddy4Study वेबसाइटवर आधीपासूनच अकाउंट असेल, तर तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी वापरून त्यात लॉगिन करा. जर अकाउंट नसेल, तर New Register या ऑप्शनवर क्लिक करून सर्वप्रथम तुमचे अकाउंट बनवा.
  • आता लॉगिन केल्यानंतर तुम्हाला थेट कोटक कन्या स्कॉलरशिपच्या ऑनलाइन अर्जावर Redirect केले जाईल. तेथे Start Application या ऑप्शनवर क्लिक करा.
  • त्यानंतर फॉर्ममध्ये विचारली जाणारी तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती आणि कुटुंबाच्या उत्पन्नाची माहिती अगदी व्यवस्थित पद्धतीने आणि अचूक भरा.
  • आता वर सांगितलेली आवश्यक कागदपत्रे योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  • त्यानंतर नियम आणि अटी मान्य करा. तसेच, एकदा Preview या बटणावर क्लिक करून फॉर्ममध्ये भरलेली माहिती अगदी बरोबर आहे की नाही, ते एकदा नक्की तपासा.
  • मित्रांनो, सर्व माहिती बरोबर असल्यास Submit या पर्यायावर क्लिक करा. अशा पद्धतीने तुमचा अर्ज सक्सेसफुली सबमिट होऊन जाईल.

आता महत्त्वाचं म्हणजे, तुमचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आणि ईमेल आयडीवर एक कन्फर्मेशन मेसेज येईल.

विद्यार्थिनींची निवड प्रक्रिया कशी असेल?

मित्रांनो, कोटक कन्यास स्कॉलरशिपची निवड प्रक्रिया अतिशय पारदर्शक आणि merit based असते. ही प्रक्रिया प्रामुख्याने खाली दिलेल्या टप्प्यांमध्ये पार पडते.

  • Initial Shortlisting: सर्वप्रथम प्राप्त झालेल्या अर्जांमधून विद्यार्थिनींचे बारावीमधील गुण 75% किंवा त्यापेक्षा जास्त असतील तसेच कुटुंबाचे वार्षिक आर्थिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा कमी असेल, या आधारावर पहिली यादी तयार केली जाते.
  • Interviews: त्यानंतर शॉर्टलिस्ट झालेल्या विद्यार्थिनींच्या कागदपत्रांची व्यवस्थित पद्धतीने पडताळणी केली जाते. खऱ्या अर्थाने आर्थिक गरज असलेल्या आणि शिक्षणाबद्दल गंभीर असलेल्या विद्यार्थिनींची ओळख पटवण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने मुलाखती घेतल्या जाऊ शकतात.
  • Final Selection: मुलाखतीमधील कामगिरी तसेच एकूण प्रोफाइल आणि रँक ऑर्डरनुसार Kotak Education Foundation द्वारे अंतिम लाभार्थी मुलींची निवड केली जाते. त्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीची एकूण रक्कम मंजूर केली जाते. महत्त्वाचं म्हणजे, शिष्यवृत्ती चालू राहण्यासाठी विद्यार्थिनींना पदवीच्या प्रत्येक वर्षात चांगले गुण मिळवणे आवश्यक असते.

Official website, application deadline and direct link

DetailsOfficial Information
Official Application PortalBuddy4Study – Kotak Kanya Scholarship Application Portal
Last Date to Apply15-Oct-2026

मित्रांनो, ही स्कॉलरशिप मुलींना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. Kotak Kanya Scholarship हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते.

आता तुमच्या ओळखीमध्ये, गावात किंवा नातेवाईकांमध्ये जर अशी एखादी होतकरू आणि हुशार विद्यार्थिनी असेल, जी पैशांच्या अभावी व्यावसायिक शिक्षण घेऊ शकत नाही, तर तिला या योजनेची माहिती नक्की शेअर करा. ही माहिती तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या तसेच फेसबुक ग्रुपच्या, यासोबतच Instagram च्या माध्यमातून शेअर करू शकता.

Swaraj
Swaraj

नमस्कार, मी स्वराज देशमुख (Founder scholarinfo.in) आणि सीनिअर कंटेंट स्ट्रॅटेजिस्ट. माझा 2019 पासूनचा Blogging आणि Graphic Designing चा प्रदीर्घ अनुभव आहे. याच अनुभवाच्या आधारावर, मी सरकारी नोकरी, करिअर संधी आणि ऑनलाईन अर्निंगच्या 'Official Data' चे विश्लेषण करून वाचकांना अचूक मार्गदर्शन देतो. युवकांना आत्मनिर्भर बनवणे हाच माझा उद्देश आहे. डेली अपडेट्ससाठी मला Instagram (@scholarinfo) वर नक्की Follow करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *