SML Mahindra Scholarship 2026-27: मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की भारतातील रस्ते वाहतूक आणि कमर्शियल वाहनचालकांचे जीवन अत्यंत आव्हानात्मक असते. म्हणजेच, देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला हा वर्ग अनेकदा आर्थिक अस्थिरता, कामाची अनिश्चितता, तसेच सामाजिक सुरक्षेच्या अभावाचा सामना करत असतो. या प्रतिकूल परिस्थितीचा थेट परिणाम त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर आणि विशेषतः मुलींच्या उच्च शिक्षणावर होत असतो. पैशांच्या अभावी अनेक हुशार मुलांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते.
आता या समस्येचा तोडगा काढण्यासाठी SML Mahindra Limited ने आपल्या Corporate Social Responsibility (CSR) धोरणाअंतर्गत एक अतिशय महत्त्वाचा आणि विद्यार्थ्यांसाठी उपयोगी उपक्रम जाहीर केला आहे.
म्हणजेच, SML Mahindra Scholarship 2026 च्या नवीन अपडेटनुसार, व्यावसायिक वाहनचालकांच्या गुणवंत मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये टिकून ठेवण्यासाठी आणि त्यांना Science, Technology, Engineering आणि Mathematics या क्षेत्रांमध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ही शिष्यवृत्ती दिली जात आहे.
आता विद्यार्थी मित्रांनो, या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थिनींना दरवर्षी 10 हजार ते 30 हजार रुपयांपर्यंत SML Mahindra Scholarship चे फायदे दिले जाणार आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या स्कॉलरशिपसाठी अर्ज प्रक्रिया कशी असेल, यासोबतच कोणती कागदपत्रे लागतील आणि जास्तीत जास्त गरजू व गरीब विद्यार्थी या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतात, याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला समजून सांगितली आहे. म्हणून लेख पूर्ण वाचा.
SML Mahindra Scholarship 2026-27
| Key Highlight | Overview |
|---|---|
| Scholarship Name | SML Mahindra Scholarship Program 2026-27 |
| Offered By | SML Mahindra Limited |
| Eligible Students | Daughters of commercial vehicle drivers across India |
| Eligible Courses | Class 11, 12, UG, Diploma & Polytechnic (STEM/Engineering) |
| Scholarship Amount | ₹10,000 – ₹30,000 per year |
| Application Mode | Online |
| Application Portal | Buddy4Study |
| Application Start Date | 21 September 2026 |
| Last Date to Apply | 01-Nov-2026 |
| Helpline | 011-430-92248 |
Two main types of this scholarship
विद्यार्थी मित्रांनो, भारतामधील शैक्षणिक व्यवस्थेमध्ये मुलींच्या गळतीचे प्रमाण हे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाच्या टप्प्यावर सर्वाधिक असते. म्हणून सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तांत्रिक शिक्षणामध्ये मुलींचा टक्का वाढावा, या उद्देशाने SML Mahindra Scholarship Program ची दोन मुख्य भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.
SML Saarthi Scholarship (For girls of 11th and 12th standard – Rs. 10,000)
जसे की तुम्हाला माहिती आहे शालेय शिक्षणानंतर म्हणजेच दहावी नंतर अनेक मुलींचे शिक्षण पैशांच्या अभावी पालकांकडून थांबवले जाते आता हे थांबवण्यासाठी आणि त्यांना उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी SML SARTHI SCHOLARSHIP 2026-27 ची रचना करण्यात आली आहे.
मित्रांनो या स्कॉलरशिप अंतर्गत अकरावी किंवा बारावी मध्ये शिकणाऱ्या आणि मागील वर्षांमध्ये उत्तम गुण मिळवणाऱ्या मुलींना एका शैक्षणिक वर्षासाठी एकूण दहा हजार रुपये इतकी थेट मदत दिली जात असते आणि ही रक्कम विद्यार्थिनींना ट्युशन फी व या पुस्तके आणि प्रवासाचा खर्च भागवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
SML Unnati Scholarship (for girls of Diploma, Polytechnic and UG Engineering – Rs. 30,000)
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जागतिक स्तरावर आणि भारतामध्येही विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढण्यावर अत्यंत भर दिला जात आहे अलीकडे एका अहवालानुसार भारतामध्ये विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या पदवीधरांमध्ये 43% महिला असल्या तरी प्रत्यक्ष नोकरी क्षेत्रात त्यांचे प्रमाण केवळ 14% इतकेच आहे आता हे चित्र बदलण्यासाठी SML UNNATI SCHOLARSHIP 2026-27 हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.
आता महत्त्वाचं म्हणजे ही योजना खास अशा मुलींसाठी आहे ज्या CORE ENGINEERING किंवा STEM संबंधित पदवी, डिप्लोमा किंवा पॉलीटेक्निक करत आहेत आता या अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थिनींना त्यांच्या तांत्रिक शिक्षणाचा भार हलका करण्यासाठी 30000 रुपयाची भरघोस शिष्यवृत्ती दिली जाते.
Eligibility and conditions required for SML Mahindra Scholarship
आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही जेव्हा कोणत्याही शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता, तेव्हा अर्ज करण्यापूर्वी या योजनेसाठी आपण पात्र आहोत की नाही, हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. म्हणून SML Mahindra Scholarship चे पात्रता निकष अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शक आहेत, जे आम्ही तुम्हाला खालील तक्त्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहेत.
- आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ही शिष्यवृत्ती योजना संपूर्ण देशातील फक्त मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच, मुलांनी जर अर्ज केला, तर त्यांचा अर्ज यासाठी ग्राह्य धरला जाणार नाही.
- अर्जदार मुलीने मागील शैक्षणिक वर्षात किंवा मागील सेमिस्टरमध्ये किमान 60 टक्के गुण किंवा त्यासमकक्ष CGPA मिळवलेला असणे बंधनकारक आहे.
- अर्जदार मुलीच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न हे 6 लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे.
- तसेच, महत्त्वाचे म्हणजे मुलीच्या पालकाकडे वैध कमर्शियल वाहन ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. म्हणजेच, विद्यार्थिनीचे वडील किंवा पालक हे मालवाहू वाहन म्हणजेच ट्रक किंवा बस किंवा मोठे प्रवासी वाहन चालवणारे कमर्शियल ड्रायव्हर असावेत.
- विद्यार्थिनी भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त शासकीय किंवा खासगी शाळा किंवा कॉलेजमध्ये शिकत असावी.
- आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, SML Mahindra Limited आणि Buddy4Study या संस्थांमध्ये काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही.
Required documents for application
- Passport-Size Photograph
- Government-Issued ID Proof
- Admission Proof
- Previous Year Marksheet
- Family Income Proof
- Bank Account Details
- Parent’s Valid Commercial Driving License
- Special Category Certificate (if applicable)
How to apply online from mobile?
आता अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठल्याही सायबर कॅफेमध्ये न जाता ते त्यांच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर घरी बसून SML Mahindra Scholarship साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. आता यासाठी Buddy4Study या प्लॅटफॉर्मने ही प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवली आहे. आता खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही अगदी सहज पद्धतीने तुमचा अर्ज भरू शकता आणि पात्र असल्यास स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकता.
- सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये जाऊन buddy4study.com ही अधिकृत वेबसाईट ओपन करा आणि सर्च बॉक्समध्ये SML Mahindra Scholarship Program 2026-27 असे टाईप करून सर्च करा.
- आता तुमच्यासमोर Apply Now हे बटन दिसेल. त्यावर क्लिक करा. आता महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही जर या वेबसाईटवरून पहिल्यांदा अर्ज करत असाल, तर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर किंवा Google Account वापरून Sign Up करावे लागेल आणि जर तुम्ही याआधीदेखील अर्ज केला असेल, तर तुम्हाला थेट Login या बटनावर क्लिक करायचं आहे.
- आता Login यशस्वी झाल्यानंतर SML Mahindra Scholarship च्या मुख्य अर्जाच्या पानावर तुम्हाला आपोआप Redirect केले जाईल. तेथे Start Application या बटणावर क्लिक करा.
- आता तुमच्या कम्प्युटर किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर एक सविस्तर फॉर्म उघडेल. तेथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, यासोबतच कौटुंबिक उत्पन्नाची माहिती आणि ज्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला स्कॉलरशिपची रक्कम मिळवायची आहे, त्या बँक खात्याचे अचूक तपशील भरा.
- तसेच, फॉर्ममध्ये जिथे कागदपत्रे विचारलेली आहेत, तेथे आधीच तयार ठेवलेल्या कॉपीज अपलोड करा. आता या कॉपीज तुम्ही PDF किंवा Image Format मध्ये अपलोड करू शकता. पण महत्त्वाचं म्हणजे, कागदपत्रे अस्पष्ट नसावीत याची आधी खात्री करा.
- आता अर्ज भरून झाल्यानंतर नियम आणि अटींच्या बॉक्सवर टिक करा आणि एकदा संपूर्ण भरलेला अर्ज Preview बटणावर क्लिक करून काळजीपूर्वक तपासा. आता महत्त्वाचं म्हणजे, तुम्ही भरलेल्या अर्जातील माहितीमध्ये नाव किंवा बँक खात्याच्या तपशीलामध्ये कोणतीही चूक झालेली नसावी.
- आता सर्वात शेवटची स्टेप म्हणजे, सर्व माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यावर Submit या पर्यायावर क्लिक करा आणि भविष्यातील संदर्भासाठी Acknowledgement Receipt डाउनलोड करून ठेवा.
Application deadline and official link
अर्जदार मित्र-मैत्रिणींनो कोणत्याही शिष्यवृत्तीसाठी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते आता बऱ्याचदा शेवटच्या दिवशी सर्वर डाऊन होण्यासारख्या तांत्रिक अडचणी कधी कधी येऊ शकतात त्यामुळे तुम्ही या स्कॉलरशिप साठी पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करणे कधीही चांगले आता या अर्ज प्रक्रियेसाठी लागणाऱ्या लिंक आणि अर्ज प्रक्रियेचे शेवटची तारीख काय असणार आहे तसेच अर्ज प्रक्रिया कधी सुरू झाली याची सविस्तर माहिती मी तुम्हाला खाली सांगितली आहे.
| Key Information | Details |
|---|---|
| Application Start Date | 21 September 2026 |
| Last Date to Apply | 21 October 2026 |
| Helpline | 011-430-92248 |
| Support Hours | Monday to Friday, 10:00 AM – 6:00 PM |
| Online Support | Buddy4Study Support Ticket |
Application Status and Beneficiary List
अर्जदार मित्र-मैत्रिणींनो, अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो, आपला अर्ज पास झाला की नाही? कारण निवड प्रक्रिया ही प्राथमिक छाननी, कागदपत्रांची पडताळणी आणि टेलिफोनिक मुलाखत अशा विविध टप्प्यांमधून पार पडत असते.
त्यामुळे तुमचा Application Status तपासण्यासाठी तुम्ही Buddy4Study या वेबसाईटवर लॉगिन करून My Application Status सेक्शनमध्ये जाऊन तपासू शकता. तेथे तुमच्या अर्जासमोर Submitted, Under Review किंवा Shortlisted for Interview असे Status दिसेल. आता महत्त्वाचं म्हणजे, टेलिफोनिक मुलाखत आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर गुणवत्ता यादी तयार केली जाते आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांची Beneficiary List पोर्टलवर जाहीर केली जाते. यासंबंधी विद्यार्थिनींना थेट ईमेल किंवा SMS द्वारे कळवले जाते. यानंतर शिष्यवृत्तीची रक्कम थेट Direct Benefit Transfer (DBT) द्वारे विद्यार्थिनींच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.
आता महत्त्वाचं म्हणजे, कमर्शियल वाहनचालकांच्या कुटुंबातील आर्थिक ताण कमी करून मुलींना त्यांच्या हक्काचे शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी SML Mahindra Scholarship Program 2026-27 हे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांसाठी एक संजीवनीच आहे. जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर जराही वेळ न वाया घालवता आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करा आणि ही महत्त्वाची माहिती तुमच्या मैत्रिणींसोबत, WhatsApp ग्रुप किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेअर नक्की करा.
या स्कॉलरशिपबद्दल तुमचे आणखी काही प्रश्न असतील, तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही 24 तासांच्या आत देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला अर्ज भरताना आणखी मदत होईल.
या शिष्यवृत्तीसाठी कोण पात्र आहे?
ही योजना फक्त अशा विद्यार्थिनींसाठी (मुलींसाठी) आहे, ज्यांच्या पालकांकडे कमर्शियल वाहन चालवण्याचा परवाना आहे आणि ज्या सध्या ११ वी, १२ वी किंवा पदवी/डिप्लोमा (STEM क्षेत्रात) शिक्षण घेत आहेत.
कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा किती असावी?
विद्यार्थिनीच्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
शिष्यवृत्तीची रक्कम किती दिली जाते?
निवड झालेल्या 11वी आणि 12वी च्या विद्यार्थिनींना 10,000 रुपये, तर पदवी (UG), डिप्लोमा आणि पॉलीटेक्निक करणाऱ्या विद्यार्थिनींना 30,000 रुपये मिळतात.
अर्जासाठी सर्वात महत्त्वाचे कागदपत्र कोणते आहे?
विद्यार्थिनीच्या पालकांचा (वडिलांचा) कमर्शियल वाहन (Heavy/Light Vehicle) चालवण्याचा वैध ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.