SSC Rechecking 2026: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल 08 मे 2026 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती जाहीर केला. पण अनेक विद्यार्थ्यांनी पेपरमध्ये चांगली कामगिरी करून सुद्धा त्यांना समाधानकारक गुण मिळाले नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी बोर्डाने Verification, Photocopy आणि Revaluation प्रक्रिया आता सुरू केली आहे.
विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चांगला पेपर लिहून सुद्धा तुम्हाला एखाद्या विषयांमध्ये कमी गुण मिळाले असं वाटत असेल तर ही तुमच्यासाठी अत्यंत सुवर्णसंधी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या सुवर्ण संधीचा लाभ कसा घ्यायचा म्हणजेच, तुम्ही रिचेकिंग साठी अर्ज कसा करू शकता. यासाठी किती फी लागणार आहे, आणि महत्त्वाच्या तारखा कोणत्या असणार आहेत. याबाबतची सविस्तर माहिती आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे लेख काळजीपूर्वक वाचा.
Maharashtra Board 10th Rechecking 2026 – Important Dates
विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 2026 च्या Rechecking साठी अधिकृत वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना Rechecking साठी अर्ज करायचा आहे अशा विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या तारखांच्या आत अर्ज करणे अनिवार्य आहे.
| Event | Date |
|---|---|
| Result declaration date | 8th May 2026 |
| Online application start date | 9th May 2026 |
| Last date for application | 23rd May 2026 (till midnight) |
| Application for revaluation | Within 5 days from receipt of photocopy |
Verification आणि Revaluation मधील फरक
विद्यार्थी मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी Verification आणि Revaluation यामधील फरक समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही.
- Verification: विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर तुमचा पेपर Verification साठी सबमिट केला तर यामध्ये फक्त गुणांची बेरीज पुन्हा तपासतात तसेच कोणताही प्रश्न तपासल्याशिवाय राहिला आहे. का हे देखील बघितले जाते आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तुमची गुणपत्रिका परत वाचली जात नाही.
- Revaluation: विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही तुमचा पेपर Revaluation साठी सबमिट केला तर तुमची उत्तर पत्रिका पुन्हा एका नवीन परीक्षकाद्वारे व्यवस्थित पद्धतीने तपासली जाते. पण महत्त्वाचं म्हणजे Revaluation साठी तुम्हाला थेट अर्ज करता येत नाही त्यासाठी तुम्हाला आधी उत्तर पत्रिकेची Photocopy मिळवणे अनिवार्य आहे.
Rechecking साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र बोर्डाने रिचेकिंग प्रक्रिया पूर्णपणे आता ऑनलाइन केली आहे. तुम्ही खाली दिलेल्या स्टेप चा वापर करून तुमचा अर्ज अगदी सहज पद्धतीने भरू शकता आणि हा अर्ज तुम्ही मोबाईल किंवा कम्प्युटरच्या माध्यमातून देखील भरू शकता. फक्त अर्ज भरताना Seat Number आणि Mother’s Name काळजीपूर्वक जवळ ठेवा.
- अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम महाराष्ट्र बोर्डाच्या https://verification.mh-ssc.ac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- आता होम पेजवर दिलेल्या ‘Verification of Marks’ किंवा ‘Photocopy of Answer Book’ या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा Seat Number आणि Mother’s Name अजून पद्धतीने भरा इथे जर तुम्ही चूक केली तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही.
- आता वेबसाईट वरती लॉगिन झाल्यानंतर तुमच्या समोर सर्व विषयाची यादी दिसेल आता ज्या विषयांची तुम्हाला Rechecking करायची आहे ते विषय निवडा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फक्त जास्तीत जास्त 06 विषय निवडू शकता.
- आता तुमच्या घराचा Address, पिन कोड आणि मोबाईल नंबर व्यवस्थित रित्या तपासा.
- आता अर्ज सबमिट करा आणि वेबसाईट वरती दिलेली आवश्यक ऑनलाईन भरा ( \FEES भरण्यासाठी तुम्ही तुम्ही डेबिट कार्ड, यूपीआय किंवा नेट बँकिंग वापरू शकता)
- विद्यार्थी मित्रांनो पेमेंट यशस्वीरित्या झाल्यानंतर अर्जाची Receipt डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून ठेवा.
Application Fee Structure 2026
| Type of Service | Fee (Per Subject) |
|---|---|
| Verification of Marks | ₹ 50 |
| Photocopy of Answer Sheet | ₹ 400 |
| Revaluation | ₹ 300 |
Important Guidelines
- विद्यार्थी मित्रांनो Revaluation अर्ज करायचा असल्यास आधी उत्तर पत्रिकेची फोटोकॉपी मिळवणे अत्यंत गरजेचे असते कारण फोटोकॉपी मिळाल्यावर त्यातील चुका पावनस तुम्ही पुढील पाच दिवसांमध्ये re-evaluation साठी अर्ज करू शकता.
- विद्यार्थी मित्रांनो re-evaluation नंतर तुमचे गुण वाढू शकतात किंवा काही दुर्मिळ परिस्थितीत कमी देखील होऊ शकतात. म्हणूनच वाटलेले किंवा बदललेले गुण विद्यार्थ्यांना मान्य करावेच लागतील.
- विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्व विषयांसाठी एकाच वेळी अर्ज करणे हिताचे असते कारण एकदा अर्ज सबमिट केल्यावर पुन्हा नवीन विषय तुम्हाला जोडता येणार नाही म्हणजे तुम्ही एकदाच अर्ज करू शकता.
- विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्या गुणांमध्ये बदल झाला तर तुम्हाला जुनी मूळ MarkSheet देखील बोर्डाला परत करावी लागते त्यानंतरच तुम्हाला नवीन MarkSheet दिली जाते.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Rechecking चा निकाल कधी लागतो?
विद्यार्थी मित्रांनो अर्ज केल्यानंतर साधारणपणे 20 ते 30 दिवसांच्या आत मध्ये बोर्डाच्या वेबसाईट वरती Rechecking चा Result उपलब्ध केला जातो.
मी नापास झालो असल्यास रिचेकिंग करू शकतो का?
हो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नापास झालेले विद्यार्थी असाल तर तुम्ही देखील Recheking किंवा Photocopy साठी अर्ज करू शकता.
फोटोकॉपी कशी मिळते?
तुम्ही अर्जात दिलेल्या ईमेलवर किंवा लॉगिन आयडीमध्ये उत्तरपत्रिकेची डिजिटल प्रत (PDF) उपलब्ध करून दिली जाते.
2026 ची Supplementary Exam कधी होईल?
जे विद्यार्थी रिचेकिंगनंतरही उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जुलै २०२६ मध्ये Supplementary Exam आयोजित केली जाईल.
हा लेख नक्की वाचा: Documents for 10th Pass Students: 10वी नंतर प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
